कोरोना होऊनही रुग्णालयातील फरशी साफ करताना दिसले ‘हे’ मंत्री, म्हणाले….

नवी दिल्ली| देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार अतिशय वेगाने झाला आहे. यामुळे रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा सर्व ताण देशातील आरोग्य यंत्रणेवर आला आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहेत.

मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

अशा संकट काळात एकीकडे कोरोना योद्धा अहोरात्र मेहनत घेत आहेत. अशातच एक सकारात्मक बातमी समोर येत आहेत.

सोशल मीडियावर मिझोरममधील एका मंत्र्याचा फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. कोरोनाची लागण झालेल्या मंत्र्यांनी रुग्णालयात सेवा केली असून रुग्णालयात फरशी साफ करतानाचा त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे.

71 वर्षाचे लालजिर्लियाना मिझोरम सरकारमध्ये ऊर्जामंत्री आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रियाही दिली आहे. लालजिर्लियाना म्हणाले, की त्यांचा उद्देश रुग्णालयातील स्टाफला लाजवणं हा नव्हता. त्यांनी स्थानिक माध्यमांसोबत बोलताना सांगितलं, की वार्डातील सफाईसाठी त्यांनी सफाई कर्मचाऱ्याला बोलावलं होतं. मात्र, त्यानं काहीच प्रतिक्रिया न दिल्यानं मंत्र्यांनी स्वतःच सफाई करण्यास सुरुवात केली.

झाडून घेणं किंवा घरातील काम करणं माझ्यासाठी नवीन नाही. ही कामं मी घरी किंवा जिथे गरज असेल तिथे करत असतो. त्यांनी असंही म्हटलं, की मंत्री आहे म्हणून मी स्वतःला इतरांपेक्षा वेगळं किंवा वरचढ समजत नाही.

लालजिर्लियाना यांना 11 मे रोजी कोरोनाची लागण झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. आधी ते दोघेही होम आयसोलेशनमध्ये होते. मात्र त्यानंतर ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने लालझिरलियाना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

लालझिरलियाना यांचं अनेकांकडून कौतुक केलं जात आहे. आपल्या कृतीतून त्यांनी मनं जिंकली असून त्यांच्यावर भरभरुन कौतुकांचा वर्षाव होतना दिसत आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

हेअरकट आवडला नाही म्हणून 10 वर्षाच्या मुलानं लावला पोलिसांना…

नागीन डान्स करुन कोरोनावर करत होता उपचार; पोलिसांनी अशा…

देशातील सर्वात लहान कोरोना योद्धा! 10 दिवसांत चिमुकलीनं केली…

कौतुकास्पद! चिमुकल्यानं सायकलसाठी जमवलेले खाऊचे पैसे दिले…

धक्कादायक! कार खरेदी करण्यासाठी आई-वडिलांनी आपल्या नवजात…