नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केलं आहे. अडीच तासांपेक्षा जास्त अधिक कालावधी हा अर्थसंकल्पाचे वाचन करण्यासाठी लागला. या अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
हा अर्थसंकल्प येत्या संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा असल्याचं सांगत फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अभिनंदन केलं.
मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करतो. विकासाला चालना देणारा असा अर्थसंकल्प आज त्यांनी माडंला आहे. हा अर्थसंकल्प विशेषता येत्या संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एकीकडे कृषी क्षेत्रासाठी प्रचंड मोठ्याप्रमाणात तरतूदी यामध्ये करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्रातील आज जी काही आव्हानं आहेत, ज्या काही अडचणी आहेत. त्या सर्व विचारात घेऊन 16 कलमी कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीसाठी संशोधन केंद्र उभारणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
-आदिवासींच्या गरीबीची चेष्टा करू नका; किरीट सोमय्यांना आव्हाडांनी दिलं सडेतोड उत्तर
-सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प; मनसेकडून मोदी सरकारचं कौतुक
-“तब्येत बिघडल्याने 2 पानं वाचायची राहिली… नाहीतर लोकांच्या डोळ्यात आणखी धुळफेक झाली असती”
-ते तिचं शरीर आहे… त्या शरीराबरोबर ती काहीही करु शकते; ट्रोलर्सना प्रियांकाच्या आईचं प्रत्युत्तर