नागपूर | विदर्भातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्र्यांचे सहायक मिलिंद नार्वेकर यांच्यावर निशाणा साधलाय.
आमचा विठ्ठल चांगला आहे. मात्र त्यांच्या अवतीभवतीचे बडवे वाईट आहेत. शिवसेनेत याच बडव्यांमुळे फूट पडली आहे, असं वक्तव्य अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केला आहे.
जे आमदार नाराज होऊन गेले आहेत ते याच बडव्यांमुळे नाराज होऊन गेले आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, त्यांचा वेळ मिळत नाही. त्यामागचं प्रमुख कारण हे बडवे आहेत, असं ते म्हणालेत.
महाविकास आघाडी सरकारवरचे संकट लवकर दूर होईल आणि सरकार वाचेल. शिवसेनेतील बंड करून गेलेले आमदार दोन-तीन दिवसात परत येतील, असा विश्वास देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केला आहे.
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी (NCP) एकनिष्ठ आहे. मला कितीही प्रलोभने दिली तरी मी त्यांच्यासोबत शिंदे गटासोबत जाणार नाही. तसंच माझा प्रवास ठरलेला आहे, तो प्रवास सिल्वर ओकचा आहे. महाविकास आघाडी एक विचार घेऊन जन्माला आलेली आहे, असं देवेंद्र भुयार म्हणालेत.
मुख्यमंत्री हे वेळ देत नव्हते आणि नाराजी मी पहिल्यांदा बोलून दाखवली होती. त्यासाठी हे पाऊल उचलण्याची गरज नाही. हे वादळ दोन दिवसात शांत होईल आणि सरकार पडणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! मुंबईत उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल
“हे वादळ दोन दिवसात शांत होईल, सरकार पडणार नाही, आमदारही परत येतील”
‘पक्ष वाचवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक’, एकनाथ शिंदे मागणीवर ठाम
‘संजय राऊत खुश कारण त्याला…’, नारायण राणेंची तुफान टोलेबाजी
‘माझ्याच लोकांना मी नको असेल तर मग काय करायचं’; उद्धव ठाकरे भावूक