नागपूर | शिवसेनेत आतापर्यंतचं सर्वात मोठं बंड पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशात अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
हे सर्व वादळ दोन दिवसात संपेल आणि गुवाहाटीला गेलेल आमदारही मागे येतील यात शंका नसल्याचा विश्वास अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांनी व्यक्त केला आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी (NCP) एकनिष्ठ आहे. मला कितीही प्रलोभने दिली तरी मी त्यांच्यासोबत शिंदे गटासोबत जाणार नाही. तसंच माझा प्रवास ठरलेला आहे, तो प्रवास सिल्वर ओकचा आहे. महाविकास आघाडी एक विचार घेऊन जन्माला आलेली आहे, असं देवेंद्र भुयार म्हणालेत.
मुख्यमंत्री हे वेळ देत नव्हते आणि नाराजी मी पहिल्यांदा बोलून दाखवली होती. त्यासाठी हे पाऊल उचलण्याची गरज नाही. हे वादळ दोन दिवसात शांत होईल आणि सरकार पडणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही, प्रत्येक मंत्र्याच्या खात्याचा परफॉर्मन्स बघा, शिवाय आमदारांच्या परफॉर्मन्सवरती भरीव निधीसाठी तरतुद करायची की नाही हे ठरत. मात्र, काम करायची नाहीत सत्ता भोगायची आणि खापर फोडायचं, असा टोलाही त्यांनी नाराज शिवसेनेच्या आमदारांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पक्ष वाचवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक’, एकनाथ शिंदे मागणीवर ठाम
‘संजय राऊत खुश कारण त्याला…’, नारायण राणेंची तुफान टोलेबाजी
‘माझ्याच लोकांना मी नको असेल तर मग काय करायचं’; उद्धव ठाकरे भावूक
“गायब आमदारांनी समोर येऊन सांगा मी नालायक आहे राज्य कारभार करायला”
‘उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरू’, नवनीत राणांची खोचक टीका