देवेद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर गंभीर आरोप

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी सरकारला धक्का दिल्याने ते कोसळले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या पाठिंब्याने शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन केले.

नवीन सरकार स्थापनेनंतर रोज सकाळ संध्याकाळ फडणवीस शिंदे आणि महाविकास आघाडीची जुपत असते. सतत दोनही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता फडणवीसांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केले आहे.

अडीच वर्षात ज्यांनी काही केले नाही, ते आम्हाला आता शहाणपणा शिकवत आहेत, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चिमूर येथे शहीद स्मृतीदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तेथे फडणवीस बोलत होते.

यावेळी फडणवीसांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली आणि विरोधकांवर टिकास्त्र देखील सोडले. गेल्या अडीच वर्षात राज्यात सरकार नावाची गोष्ट् अस्तित्वात नव्हती. अडीच वर्षात ज्यांनी काही केले नाही, ते आता आम्हाला शहाणपण शिकवत आहेत, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

माझे त्यांना एवढेच सांगणे आहे, पाच वर्षे आमचे सरकार होते, सरकार कसे चालते, हे आम्ही त्यांना दाखवून दिले होेते. आजही लोकांच्या स्मरणात आमचे 2014 ते 2019 चे सरकार आहे, असे फडणवीस म्हणाले.

आता परत एकदा आम्ही सत्तेत आलो असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा एकदा लोकाभिमूख सरकार आणू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गेल्या अडीच वर्षात 700 रुपये नुकसान भरपाई देतो, असे सांगून महाविकास आघाडी सरकारने (MVA) शेतकऱ्यांना एक नवा पैसा दिला नाही, असा आरोप फडणवीसांना महाविकास आघाडी सरकारवर केला.

संजय गांधी निराधार योजनेचे पैसे गरीब विधवांना सहा-सहा महिने मिळाले नाहीत. या सरकारने प्रत्येक सामान्य माणसाला त्रासच दिला. पण आता चिंता करण्याचे कारण नाही. कारण आता आम्ही आलो आहोत. लवकरच सगळ्या गोष्टी आम्ही मार्गी लावणार आहोत, असे देखील फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

‘जन गण मन’ ऐवजी आता ‘या’ गीताला राष्ट्रगीत म्हणून घोषित करा – हिंदू महासंघ

काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळणार, जाणून घ्या कोण कोण आहे शर्यतीत?

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, चिन्हाबाब एन. व्हि. रमणांचा महत्वपूर्ण निर्णय

शिंदे – फडणवीस सरकारमध्ये असंतोष? शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले…

विनायक मेटे अपघात प्रकरण : नवीन माहिती समोर, दोन गाड्या करत होत्या…