“वंचित आघाडीचा विरोधी पक्षनेता नाही तर मुख्यमंत्री असेल”

मुंबई : आमची लढाई ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी नाही. तर वंचितसोबतच आहे. वंचित बहुजन आघाडीचा येत्या काळात विरोधीपक्ष नेता होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर वंचित बहुजन अघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं आहे.

वंचितची ताकद वाढल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय. त्यांनी आम्हाला विरोधी पक्षनेते पद दिलं आहे. पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो वंचितचा मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे.

मी जोपर्यंत व्यूहरचना जाहीर करत नाही, तोपर्यंत काँग्रेससाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत. आम्ही व्यूहरचना जाहीर केली त्या दिवसापासून चर्चेचे दरवाजे बंद होतील, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसला प्रस्ताव देऊन दोन आठवडे झालेत. त्यांच्या कोणत्याही नेत्यांचा आम्हाला संपर्क झालेला नाही. अनेक नेते दिल्लीला जाऊन आले पण अणखी संपर्क नाही, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.

दरम्यान, काँग्रेसने एखादी जागा त्यामधली मागतली तर सेटलमेंट होत नाही. हे टाळण्यासाठी थांबलो आहोत. एमआयएम आमच्यासोबत आहे. त्यांच्याबरोबर आमची युती पक्की आहे, असंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-