मुंबई महापालिकेत शिवसेनेची जोरदार कोंडी करा; फडणवीसांनी नगरसेवकांना दिले आदेश

मुंबई | मुंबई महापालिकेत सुरूवातीला दोन वर्ष आपण शिवसेनेला पाठिंबा दिला होता. पण आज आपण राज्यात शिवसेनेच्या विरोधात आहे. मुंबई महापालिकेत हा विरोध प्रकर्षाने दिसला पाहिजे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महापालिकेत शिवसेनेची जोरदार कोंडी करा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजप आमदार आणि नगरसेवकांना दिले आहेत.

मुंबई महापालिकेत भाजपचे मोठं संख्याबळ आहे. तसा दबदबादेखील दिसला पाहिजे. शिवसेनेनं जिथं मनमानी निर्णय घेतले तिथे तुटून पडलं पाहिजे. तसेच आमदारांनीदेखील नगरसेवकांना शिवसेनेला धारेवर धरण्याचे मुद्दे पाहिजे, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुंबई भाजप अध्यक्षपदावरून आमदार मंगलप्रभात लोढा यांना हटवण्याची शक्यता आहे. तसेच भाजप मुंबई अध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे.

महत्वाच्या बातम्या-

“चव्हाणांच्या दाव्याने खळखळ किंवा खळबळ होण्याचं कारण नाही”

-मंत्रालयानंतर सर्व शाळांमध्येही मराठी सक्ती, नवा कायदा तयार करण्याचे काम सुरु

-रेडमीच्या या फोनवर तब्बल तीन हजारांचा डिस्काऊंड! जाणून घ्या या जबरदस्त फोनचे फिचर्स…

-बदल्यावर बदल्या; तुकाराम मुंढेंची बदली नागपूर महापालिका आयुक्तपदी 

-महापरिक्षा पोर्टल रद्द होणारच; काँग्रेसचं विद्यार्थ्यांना आश्वासन