भाजपची महाभरती बंद नाही… चांगल्या लोकांचे स्वागत आहे- देवेंद्र फडणवीस

वर्धा | भाजपची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘महाजनादेश’ यात्रा सुरू आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वर्ध्यात पत्रकार परिषद घेतली. भाजपची महाभरती बंद नाही… चांगल्या लोकांचे स्वागत आहे, असं वक्तव्य करत येणाऱ्या काळात पक्षात आणखी भरती होऊ शकते असा सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे.

भाजपची मेगाभरती बंद नाही… चांगल्या लोकांचे स्वागत आहे. चांगले लोकं पक्षात यायला इच्छुक असतील तर आम्ही जरूर त्यांना घेऊ. शेवटी चांगल्या लोकांची पक्षाला गरज असते, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

विदर्भातून भाजपची यात्रा सुरू झाल्यानंतर तुम्हाला भरती बंद का करावी लागली, असा प्रश्न विचारल्यानंतर शेवटी सगळ्या लोकांनाच आम्ही पक्षात स्थान देऊ शकत नाही मात्र जे त्यातील चांगले लोकं आहे. त्यांना आम्ही घेऊ, असं ते म्हणाले.

जनाधार असलेल्या लोकांची पक्षाला गरज असते. म्हणून येणाऱ्या काळात जनाधार असलेल्या लोकांना आणि ज्यांनी याअगोदर विकास केलाय… ज्यांचं मतदारसंघात स्वत:च अस्तित्व आहे, अशा लोकांना आम्ही संधी देणार आहोत, असंही ते म्हणाले.

काही पक्षांची अवस्था झाली आहे की पक्षात रहावे म्हणून कार्यकर्त्यांना शपथ दिली जात आहे. मात्र शपथ घालून तरी कार्यकर्ते थांबतील का??हा खरा प्रश्न आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, महाजनादेश यात्रेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. भाजप-शिवसेना युती मोठ्या बहुमताने पुन्हा एकदा सत्तेवर येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; मालेगावच्या 20 नगरसेवकांची ‘हे’ कारण देत पक्षाला सोडचिठ्ठी!

-मुख्यमंत्रीपद दिलं तर घेणार का?? चंद्रकांत पाटलांच्या उत्तराने उपस्थित अवाक

-ठरलं! येवल्यात छगन भुजबळांना टक्कर द्यायचा शिवसेनेचा प्लॅन तयार…

-“विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडासाफ होईल”

-शपथ घालून तरी कार्यकर्ते थांबतील का??; मुख्यमंत्र्यांच्या रडारवर राष्ट्रवादी!