पुन्हा मैदानात जाऊन राज्य काबीज करेन; देवेंद्र फडणवीसांचा एल्गार

मुंबई | ठाकरे सरकारच्या कारभाराविरोधात तसंच शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचाराविरोधात भाजप आज मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आशिष शेलार यांसह महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीवरून ठाकरे सरकारवर तुफान हल्लाबोल विश्वासघाताने आलेलं हे सरकार आलेलं आहे. हे सरकार जनतेने निवडून दिलेलं नाहीये. पण काळजीचं कारण नाहीये पुन्हा मैदानात जाऊन राज्य काबीज करेन, असा एल्गार देवेंद्र फडणवीस यांनी केली.

एक नवा पैसाही शेतकऱ्याला दिलेला नाही. असली कर्जमाफी करून ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. सातबारा कोरा करू म्हणणाऱ्यांची भाषा आता बदलली आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. दोन महिन्यात सरकारने 15 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. महिन्याला साडेसात हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विक्रम या सरकारने केला आहे. अशा वेगाने 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी 400 महिने लागतील, असं फडणवीस म्हणाले आहेत.

आज ओ हुऐ मशहूर, जो कभी काबिल न थे…. मंजिले मिली है जिनको जो कभी दौड में शामिल न थे… अशी शायरी म्हणत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा देखील टोला लगावला.

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 25 हजार रूपये हेक्टरी मदत देतो म्हणून जाहीर केलं होतं. मग आता दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. तसंच फडणवीस सरकारच्या प्रकल्पांना ठाकरे सरकार देत असलेल्या स्थगितींवर देखील फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला. हे काम करणारं सरकार नसून हे स्थगिती सरकार असल्याची टीका त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-शिवसेनेनं काय खायचं सोडलं? रस्त्यातलं डांबर, नाल्यातला कचरा; आशिष शेलारांची बोचरी टीका

-“तुम्हाला कर्जमाफीवर बोलण्याचा अधिकार नाहीये… तुम्ही शेतकऱ्यांना फसवून खेट्या मारायला लावल्या”

-…तर उद्धवजी अन् अजितदादा, शेतकरी कर्जमाफीला 400 महिने लागतील- फडणवीस

-सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज चढलाय; आशिष शेलारांची जहरी टीका

-इंदोरीकर महाराजांना दिलासा; सायबर सेलचा मोठा खुलासा