उद्धवजी, तुम्ही सावरकरांचा अपमान कधीपर्यंत सहन करणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई |  काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांच्या ‘शिदोरी’ या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे आणि शिवसेना किती काळ सावरकरांचा अपमान सहन करणार आहे? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेसने राष्ट्रपुरूषांना अपमानित करण्याची मालिका सुरूच ठेवली आहे. शिवसेना यावर काहीच का बोलत नाहीये? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपुरूषांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसबद्दल आपली भूमिका जाहीर करावी, असं फडणवीस म्हणाले.

दुसरीकडे मध्य प्रदेशातील छिंदवाड्यातील शिवाजी महाराजांचा पुतळा चुकीच्या पद्धतीने हटवला गेला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले-

आपल्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही. मध्य प्रदेश सरकारने आणि काँग्रेसने याप्रकरणी माफी मागावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने बसवावा.

महाराष्ट्र काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरीमध्ये सावरकरांवर लेख लिहिण्यात आला आहे. यामध्ये सावरकरांना स्वातंत्र्यवीर नव्हे तर माफीवीर संबोधलं गेलं आहे. यावर आता शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी. की शिवसेना सत्तेच्या मोहापायी शांतच राहणार आहे, असं फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपला धक्का; शिवसेना राष्ट्रवादीत इनकमिंग?

-आमचे पूर्वज हिंदूच होते मग आम्ही नागरिकत्वाचा दाखला का द्यावा?; सय्यदभाईंचा सरकारला सवाल