मुंबई | लॉकडाऊनच्या काळात सीबाआय आणि ईडीचा आरोप असलेले उद्योजक वाधवान यांना गृह विभागाचे सचिव अमिताभ गुप्ता यांनी विशेष प्रवास दिला होता. या प्रकरणी राज्य सरकारने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मात्र त्यांना आता परत त्यांच्या जागी नेमण्यात आलं आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
हे आघाडी सरकारवर आहे की वाधवान सरकार आहे, असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रवासाचा विशेष पास कोणताही अधिकारी आपल्या भरोश्यावर देऊ शकत नाही. जोपर्यंत सरकारमधले किंवा सरकार चालवणारे लोक अधिकाऱ्याला इशारा देत नाहीत तोपर्यंत तो अधिकारी असं धाडस करणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
या संपूर्ण घटनेची संपूर्ण चौकशी सीबीआयमार्फत केली जावी, ही आमची मागणी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. तसंच ज्या गतीने त्यांची चौकशी केली गेली आणि त्यांना क्लिन चीट दिली गेली यातून हे स्पष्ट होतंय की सरकारमधल्या किंवा सरकार चालवणाऱ्यांच्या इशाऱ्यावरच त्यांनी वाधवान यांना प्रवास सवलतीचा विशेष पास दिला होता, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान, वाधवान कुटुंबाला प्रवासाचा पास दिल्याप्रकरणी अमिताभ गुप्ता यांची राज्य सरकारने सखोल चौकशी केली. चौकशीतून त्यांना शासनाने क्लिनचीट दिली आहे. तसंच त्यांच्या आधीच्या जागी त्यांना नियुक्त केलं आहे.
हे सरकार आघाडीचे आहे की वाधवान सरकार?
या संपूर्ण घटनेची संपूर्ण चौकशी सीबीआयमार्फत केली जावी, ही आमची मागणी आहे.#CBIEnquiry #WadhwanCase #Maharashtra pic.twitter.com/BsBdsf9wAr— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 18, 2020
महत्वाच्या बातम्या-
-माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही- पृथ्वीराज चव्हाण
-अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला- जितेंद्र आव्हाड
-मुख्यमंत्री कमी पडत आहेत असं मी म्हणालोच नाही- पृथ्वीराज चव्हाण
-कोरोना झाल्याचं कळलं तेव्हाच मी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामध्ये…-जितेंद्र आव्हाड
-21 लाख कोटींच्या पॅकेजवर लक्ष ठेवण्यासाठी मोदींनी तयार केली टीम; ‘या’ पाच जणांवर दिली जबाबदारी