महाराष्ट्र मुंबई

मतदारांची माहिती आधारला लिंक करा; फडणवीसांची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई |  मागील काही महिन्यांपासून आपलं आधार बँकेशी लिंक करा, असं नोटिफिकेशन जवळपास सगळया नागरिकांना आलं असेल. मात्र आता मतदान ओळखपत्रही आधारशी लिंक करा, अशी मागणी होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची माहिती आधारला लिंक करा, अशी मागणी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रिय निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं आहे आणि या पत्रात मतदारांची माहिती आधारला लिंक करण्याची मागणी केली आहे.

विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत बोगस मतदान आणि मतदार यादीतील घोळ टाळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेच्या कामकाजादरम्यान हा मुद्दा उपस्थित करत मतदारांची माहिती आधारला लिंक करा, अशी मागणी केली होती. याच मुद्द्याचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, माहितीच्या गोपनियतेपासून, माहितीची चोरी आणि गुप्त देखरेख या आणि इतर अशा अनेक प्रकारचे आक्षेप याआधी घेतले गेले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने जर मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याचा निर्णय घेतला तर काय काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“सरकारवर टीका करायची आणि पुन्हा एकत्र बसायचं ही शिवसेनेची नाटकबाजी”

-बाळासाहेब ठाकरेंची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी व्हावी; शिवसेनेची मागणी

-“युतीचा विचार सोडून निवडणुकीच्या तयारीला लागा”

-डिस्चार्ज दिलेल्या रूग्णाच्या पायात 2 इंचाची काच; मनसेने उघडकीस आणला हॉस्पिटलचा प्रताप

“काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात; लवकरच पक्षात प्रवेश करतील”

IMPIMP