मुंबई : विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन बेकायदा असल्याचा आरोप केला आहे. तसेच मला संविधानावर बोलण्याचा अधिकार नसेल तर मी सभागृहात थांबणार नाही, असं म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस आपला मुद्दा सभागृहात मांडत होते. यावेळी विरोधी पक्षांकडून गोंधळ सुरु झाला. यावेळी त्यांना शांत करण्यासाठी फडणवीसांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर हे वक्तव्य केलं आहे.
अधिवेशनाची सुुरुवात वंदे मातरमने व्हायला हवी होती. 27 नोव्हेंबरला राष्ट्रगीत झालं म्हणजे अधिवेशन संस्थगित झालं. अधिवेशन पुन्हा बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज होती. राज्यपालांचं समन्स नसल्याने हे अधिवेशन नियमाला धरून नाही, असा हल्लाबोल फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केला आहे.
दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आज विधानसभेत विश्वासदर्शक
प्रस्ताव मांडत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दिलीप वळसे पाटलांनी फेटाळवा देवेंद्र फडणवीसांचा आक्षेप – https://t.co/HG07SWsaW6 @Dwalsepatil @Dev_Fadnavis #Assembly
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
“वाघाचं नाव घेऊन सशाच्या काळजाचं सरकार आणताय?”-https://t.co/Un1kGQIuFX @uddhavthackeray @ShelarAshish @ShivSena @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
या पठ्यानं घेतल्या 6 चेंडूत तब्बल 5 विकेट; मैदानावर घातलं धुमशान!- https://t.co/Xjc9ImAuBZ @BCCIdomestic @ICHOfficial @IPL @abhimanyumithun @himanshurane @cricketworldcup
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019