“आमच्या फसलेल्या गनिमी काव्याच्या प्रयोगाचे नायक अजित पवार अन् मी सहनायक”

मुंबई |  अजित पवार यांच्या सहाय्याने आम्ही शपथविधी केला. अजित पवार यांच्यासोबतीने आम्ही गनिमी कावा केला. परंतू आमचा गनिमी कावा काही कारणाने फसला. अजित पवार आमच्या फसलेल्या गनिमी काव्याचे नायक आहेत तर मी सहनायक आहे, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचे अनेक पदर उलगडून सांगितले.

अजित पवार यांच्याबद्दल आता आपलं काय मत आहे? या प्रश्नावर ते आमच्या फसलेल्या गनिमी काव्याचे नायक आहेत तर शरद पवार मात्र देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची आमची दुश्मनी नाही, असं फडणवीस म्हणाले.

मुलाखतकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना रॅपिड फायर पद्धतीने काही प्रश्नांची उत्तर विचारली. धनंजय मुंडे यांच्यावरच्या प्रश्नाला विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी 5 वर्ष काम केलं. त्यांनी सातत्याने भाजपवर आणि पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. मी सातत्याने पंकजांच्या पाठिशी उभा राहिलो आणि त्यांनी भाजपवर केलेले आरोप खोडून काढले. ते आता नवीन रोलमध्ये येतील त्यानंतर त्यांचं काम पाहून मी त्यांच्यावर अधिकचं बोलेल, असं उत्तर फडणवीसांनी दिलं.

पंकजा मुंडे या माझ्या भगिनी असल्यासारखे आहेत आणि माझ्या सहकारी आहेत. मी कालही त्यांच्या पाठिशी होतो आजही आहे आणि उद्याही राहिल, असं ते म्हणाले तर उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहेत. त्यांच्याशी माझे मित्रत्वाचे संबंध कायम राहतील, असंही फडणवीस म्हणाले. तसंच राऊतांचं नाव घेतल्यावर त्यांनी लिहिताना आणि बोलताना जरासं सांभाळून, असा सल्ला राऊतांना देणं पसंत केलं.

महत्वाच्या बातम्या-