मुंबई | आयएनएस आणि सी-व्होटर्सने लोकप्रिय मुख्यमंत्र्यांबाबत एक देशपातळीवर सर्व्हे केला. या लोकप्रिय 5 मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यावर भाष्य करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
हा सर्व्हे कोणाचा आहे, ते मला माहिती नाही. हा सर्व्हे मी बघितला नाही. कोणाला ते लोकप्रिय वाटत असतील, तर ते चांगलंच आहे. पण आता अपेक्षा एवढीच आहे, की महाराष्ट्र सरकारने कोविडमध्ये चांगलं काम केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या कामाने मुंबईकरांना दिलासा मिळाला पाहिजे. मुंबईतल्या लोकांची आजची अवस्था अत्यंत वाईट आहे. आपण सोशल मीडियावर जाऊन मुंबईची अवस्था जर बघितली, तर कोणाची लोकप्रियता किती आहे, हे आपल्या लक्षात येईल, अशी टोलेबाजी करताना माझ्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांची पुन:श्च हरी ओम ही संकल्पना चांगलीच आहे. सगळ्या राज्यांना सुरुवात करावी लागेलच. जमिनीवर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला पाहिजे. खुल्या दिलाने पुन:श्च हरी ओम करावं लागेल, तरच उद्योग सुरू होतील, असं फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-लॉकडाऊन काळात भुजबळांचं खातं ‘अॅक्टीव्ह’, अन्न नागरी पुरवठा विभागाचा अन्नधान्य वाटपात विक्रम
-कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा- अजित पवार
-केरळच्या हत्तीणीच्या पोस्टमाॅर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आलंय मृत्यूचं कारण?
-“… आणि ट्रोल करणाऱ्यांना बंगल्यावर नेऊन झोडणारे पहिले मंत्रीही तुम्हीच”
-रायगड जिल्ह्याला 100 कोटी रुपये मदत तोकडी ठरेल- देवेंद्र फडणवीस