पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कारवाईवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India) या केरळमध्ये स्थापन झालेल्या संघटनेवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे. गेेले तीन ते चार दिवस या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या (NIA) छापेमारीनंतर देशविरोधी कारवाया करणे या आरोपावर पीएफआय (PFI) या संघटनेवर कारवाई करत केंद्र सरकारने तिच्यावर आणि पीएफआयशी संबंधित संस्थांवर बंदी घातली.

पीएफआयच्या माध्यामातून देशात दुष्प्रचार सुरु होता. या संघटनेच्या निशाण्यावर काही राजकीय नेते होते. देशात हल्ले करण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली.

फडणवीस यांनी पीएफआयवर भाष्य केले आहे. ही पीएफआय संघटना सायलेंट किलर (Silent Killer) असल्याचे देखील फडणवीस म्हणाले. तसेच पीएफआयविरोधात मोठ्या प्रमाणात पुरावेे उपल्बध आहेत, असे देखील फडणवीस म्हणाले.

देशात गैरकृत्य करण्यासाठी या संघटनेने आर्थिक यंत्रणा तयार केली असून मोठ्या प्रमाणात या संघटनेतील लोकांकडून बॅंक खाती उघडली गेली आहेत. तसेच कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यात थोडे पैसे जमा केले जातात, असे देखील फडणवीस म्हणाले.

पीएफआयवर घातलेल्या बंदी संदर्भात लवकरच राज्यांना अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. शिवाय पीएफआय आणि संबंधित सहा संघटनांवर कारवाई करणार  असल्याचे देखील फडणवीस म्हणाले.

सीमी (Students Islamic Movement of India) या अतिरेकी संघटनेवर बंदी घातल्यानंतर काही लोकांनी एकत्र येत पीएफआय सारखी अतिरेकी संघटना काढली होती. पण देशातील गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळे यांचे बिंग फुटले आहे, असे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

मग घ्या ना धौती योग!’ म्हणत आशिष शेलारांचे शिवसेनेला पत्र; वाचा सविस्तर पत्र

टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात

‘पीएफआय’बाबत किरीट सोमय्यांचा मोठा दावा; म्हणाले, या संघटनांना निधी…

न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘कमळाबाई’ म्हणत भाजपची सामनातून केली पोलखोल

‘शिवभोजनथाळी’बाबत मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय