“राज ठाकरेंचे बोल आधी गुलूगुलू वाटायचे, आता खाजवायला होतंय”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या दोन सभांनंतर आता राज्यातील राजकीय वातावरण हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून ढवळून निघत आहे. राजकीय पटलावर सध्या याच चर्चा सुरू असल्याचं दिसतंय.

राज ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. अमोल मिटकरी यांनी थेट राज ठाकरे यांचा उल्लेख खाज
ठाकरे असा केला होता.

त्यानंतर मनसे नेते आक्रमक झाले होते. मनसेच्या नेत्यांनी अमोल मिटकरींचा उल्लेख मटन करी असा केला. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला चिमटे काढले आहेत.

राज ठाकरे 2019 च्या आधी जेव्हा त्यांच्यासोबत होते, त्यावेळी त्यांना राज ठाकरे यांचे बोल गुलूगुलू वाटायचे, तेव्हा त्यांना गुदगुल्या होयच्या. आता राज ठाकरे सत्य बोलत आहेत, तर त्यांना खाजवायला होतंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, अमोल मिटकरी सध्या ब्राम्हण समाजावर टीका केल्याने चर्चेत आहे. त्यामुळे ब्राम्हण समाज आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण वेगल्या वळणावर जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण, भाजप आमदाराला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Maruti Suzuki XL6 Facelift: हायटेक फिचर्ससह भारतीयांची आवडती कार लाँच; किंमत पण फारच कमी

CSK vs MI: मुंबईसोबतच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका!

सिंगल लोकांनो नक्की वाचा! विवाहित पुरूषांबाबत कंगणा राणावत म्हणाली…

चिंताजनक! कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय; संशोधनातून ‘ही’ 4 भलतीच लक्षणं समोर