अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल!

मुंबई : अधिवेशनाची सुुरुवात वंदे मातरमने व्हायला हवी होती. 27 नोव्हेंबरला राष्ट्रगीत झालं म्हणजे अधिवेशन संस्थगित झालं. अधिवेशन पुन्हा बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज होती. राज्यपालांचं समन्स नसल्याने हे अधिवेशन नियमाला धरून नाही, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

आज ठाकरे सरकारचा विश्वासदर्शक ठराव पार पडत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी पहिले पाच मिनिटे अतिशय वादळी भाषण करत नव्या सरकारवर हल्लाबोल केला.

हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीप्रमाणे होत नाही. रात्री-अपरात्री बोलावून असं अधिवेशन होत नाही. आमचे सदस्य ठरावाला पोहचू नयेत म्हणून रात्री निरोप दिला, असा आरोप फडणवीसांनी केला. यावेळी भाजप आमदारांनी नही चलेगी, नही चलेगी… दादागिरी नही चलेगी, अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं.

राज्यपालांच्या समन्सनेच हे अधिवेशन बोलावलं आहे.  हे अधिवेशन पूर्णपणे कायदेशीर आहे. तुमचा मुद्दा मी फेटाळून लावतो, अशा शब्दात विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं.

महत्वाच्या बातम्या-