चार वाजता काय होणार? फडणवीसांच्या ‘या’ कृतीकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष!

मुंबई |  महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि राज्याच्या राजकारणात पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडी यावर राजकीय वर्तुळात विविध अंदाज बांधण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दुपारी चार वाजता माध्यमांशी संवाद साधत आहेत.

कोरोना महामारीच्या साथीपासून ते आतापर्यंत ,ठाकरे सरकार परिस्थिती हाताण्यात अपयथी ठरले आहे, अशी टीका करत महाराष्ट्रात राज्यपाल राजवट लागू करावी, अशी मागणी भाजप नेत्याने केली होती.  यावरून देखील राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. आता याप्रकरणावर फडणवीस काय बोलणार याकडे देखील उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसने सरकारमधून बाहेर पडावं, असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केलं आहे. शिवाय राज्यपालांच्या भेटी घेण्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते अग्रभागी आहेत. यात काँग्रेस कुठंच दिसत नाही. यावरून देखील उलट-सुलट चर्चांना पेव फुटलं आहे.

दुसरीकडे करोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ quarantine व्हावे हेच बरे, अशी बोचरी टीका करत महारा्ष्ट्र विकास आघाडीचं सरकार मजबूत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“पॅकेजची रिकामी खोकी व विरोधकांची रिकामी डोकी, एकदा गुजरातची अंधारकोठडी बघायला जा”

-‘कठोर निर्णय, धडक अंमलबजावणी’, नागपुरात कोरोना नियंत्रणाचा तुकाराम मुंढे पॅटर्न!

-“विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच निर्णय घेतला जाईल”

-“महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचा वनवास 14 वर्षांचा असेल हे आम्ही खात्रीने सांगतो”

-मातोश्रीची पायरी का चढलो?; शरद पवार यांनी सांगितलं कारण