कामं होत नसली की फक्त बहाणे सांगायचे; फडणवीसांची अजित पवारांवर टीका

परभणी |  मराठवाड्याला मुबलक पाणी मिळावं आणि मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना आखली होती. मात्र याच योजनेला ठाकरे सरकारने ब्रेक लावण्याचे संकेत दिले आहेत. मराठवाडा वॉटर ग्रीड या फडणवीसांच्या योजनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच या योजनेवर तज्ञांकडून सल्ला घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर नाराजी व्यक्त करत अजित पवार यांना टोला लगावला आहे.

कामं होत नसली की फक्त बहाणे सांगायचे…. जाणीवपूर्वक काही टेक्नीकल चुका सांगायच्या, असा या नव्या सरकारचा इरादा आहे. कारण काही काम करायचं नसलं तर फक्त बहाणे सांगून मोकळं व्हायचं, असं ते म्हणाले.

‘there is a will, there is a way’ असं इंग्रजीत म्हणतात. म्हणजे जिथे इच्छा असेल तेथे मार्ग मिळतो. मात्र जिथे इच्छा नसते तेथे केवळ सर्व्हे असतो. त्यामुळे कोणतंही टेक्निकल कारणं सांगून मराठवाड्याची वाॅटर ग्रीड योजना थांबवण्याचा प्रयत्न झाला तर तो मराठवाड्यावर अन्याय असेल, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, या सरकारमध्ये काम करण्याची इच्छा नाही. त्यामुळे हे सरकार कारणं सांगत आहे, असं टीकास्त्र त्यांनी सरकारवर सोडलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-नाईट लाईफ करून श्रीमंतांच्या पोरांची सोय केली शेतकऱ्यांचं काय??- फडणवीस