Top news महाराष्ट्र मुंबई

आम्ही स्वबळावर लढलो असतो तरी आम्ही 144 चा आकडा गाठला असता- देवेंद्र फडणवीस

मुंबई |  आम्ही स्वबळावर लढलो असतो तर आम्ही 144 चा आकडा गाठला असता, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आमच्याकडे स्वबळावर सत्तेत येण्याएवढी ताकद होती, असंही ते म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकांपूर्वी शिवसेना आणि भाजपादरम्यान 50-50 टक्के जागा लढवण्यावर चर्चा झाली होती आणि एकमतही झालं होतं. परंतु राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नव्हती, असं ते म्हणाले आहेत.

लोकसभेच्या निवडणुकांनंतर परिस्थिती बदलली. त्यामुळे विधानसभेबाबत चर्चा करताना शिवसेनेनं काही प्रमाणात कमी जागा घेण्याचा प्रस्ताव स्वीकारला. पण त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला, असंही फडणवीस म्हणाले.

अनेकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आमचे फोनही घेतले नाहीत. ते राज्यातील कोणत्याही नेत्याशी बोलायला तयार नव्हते अशा परिस्थितीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येतील आणि मातोश्री समोर उभे राहतील असं काही घडलं नसतं. आम्हीदेखील एक राष्ट्रीय पक्ष आहोत आणि आम्हालादेखील इतर राज्यात सरकार चालवायचं आहे, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले; 24 तासात वाढले ‘एवढे’ रुग्ण

-निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी, शिवसेनेचं सगळं ठरलं होतं- देवेंद्र फडणवीस

-ब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

-…तोपर्यंत रेल्वे स्थानकावर गर्दी करु नका; रेल्वे प्रशासनाचं आवाहन

-महाराष्ट्रातील 104 वर्षे जुन्या सहकारी बँकेचा परवाना रद्द; लॉकडाऊनमध्ये खातेधारकांची आर्थिक कोंडी