Top news पुणे महाराष्ट्र

छोटी राज्यपण तुमच्यासारखी जीएसटीसाठी रडत नाहीत; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई |  कोरोनाच्या संकटामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील इतर राज्यांची जीएसटीची भरपाई थकली आहे. मात्र, तरीही अगदी लहान राज्यंही त्यासाठी तुमच्याप्रमाणे रडत बसलेली नाहीत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारकडून जीएसटी थकबाकीविषयी करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. जीएसटीची भरपाई ही केंद्र सरकारने देणे अपेक्षित नाही. ही भरपाई जीएसटी कौन्सिलच्या फंडातून देण्यात येते. मात्र, आता या फंडातील रक्कम संपल्यामुळे जीएसटीची भरपाई देणे शक्य नाही, असं ते म्हणाले.

एकट्या महाराष्ट्राची जीएसटीची रक्कम थकलेली नाही. महाराष्ट्रापेक्षा आणखी कितीतरी राज्यांचे जास्त पैसे थकलेले आहेत. मात्र, त्या राज्यांच्या अर्थमंत्र्यांना ही बाब माहिती आहे. त्यामुळे ते जीएसटीच्या पैशासाठी रडत न बसता लढत आहेत, असं ते म्हणाले.

राज्य सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी दररोज नवनवे मुद्दे उकरून काढत आहे. हे एकप्रकारचे कव्हरिंग फायर आहे, अशी टीकाही त्यांनी ठाकरे सरकारवर केली.

महत्वाच्या बातम्या-

-सरकार भूमिका घेईल असं वाटत नाही, आता नातेवाईक मित्रमंडळींना भेटायला सुरू करा- आंबेडकर

-लॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयाआधीच बच्चू कडूंनी अकोल्यात संचारबंदी केली जाहीर

-शरद पवारांचं ‘ते’ वक्तव्य ऐकून मी निराश झालो- देवेंद्र फडणवीस

-पॅकेज जाहीर करू नका, असं नरेंद्र मोदींनीच सांगितलं- उद्धव ठाकरे

-शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…