मुंबई | भाजपने अजित पवारांच्या सोबतीने स्थापन केलेल्या सरकारविरोधात महाविकासआघाडीने दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय आमच्या विरोधात जाईल असं वाटलं नव्हतं, असं मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर अजित पवार यांनी तुमची साथ सोडली का? असा प्रश्न मुलाखतीदरम्यान फडणवीसांना विचारण्यात आला. यावर फडणवीसांनी निकालामुळे अजित पवार यांनी माघार घेतली का हे अजित पवारच सांगू शकतील, असं उत्तर दिलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो आम्हाला अपेक्षित नव्हता. न्यायालयाने जो निकाल दिला तो आम्ही मान्य केला, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांबरोबरच्या सत्ता स्थापनेसंदर्भात पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत, त्या योग्यवेळ आल्यावर नक्की सांगेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या –
भाजपचा ‘हा’ आमदार देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर! – https://t.co/SjzU2eR83Z @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 10, 2019
“आर्थिक अपयश झाकण्यासाठी धार्मिक झगडे लावण्याचा सरकारचा डाव” – https://t.co/rTl0c994Rl @Prksh_Ambedkar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 10, 2019
शिवसेनेनं राष्ट्रवादीपासून सावध राहावं; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला सल्ला – https://t.co/XLuUHFvXw0 @ChDadaPatil @ShivSena @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 10, 2019