ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी म्हणणाऱ्या भुजबळांना फडणवीसांचं उत्तर

मुंबई |  ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हाही याबाबत विधानसभेत चर्चा सुरु आहे. यावेळी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आपलं मत व्यक्त केलं.

भुजबळांच्या मागणीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिलं आहे. समर्थन देताना देवेंद्र फडणवीस यांनी योगायोगाने देशाचे पंतप्रधानदेखील ओबीसी असल्याचं सांगितलं.

आम्हाला या विषयाबद्दल आधी कळवलं असतं तर आम्ही अधिक माहिती घेतली असती. आम्हाला विश्वासात घेतलं असतं बरं झालं असतं. भुजबळ यांनी मांडलेला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आमचं त्यांना समर्थनच आहे, असं फडणवीस म्हणाले.

ओबीसींसाठी योजना, कार्यक्रम राबवताना जनगणना माहिती असेल तर धोरण आखण्यास मदत होते. सातत्याने ही मागणी होत आहे. सर्व पक्षांचं त्याला समर्थन आहे, असंही फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमवर ठाकरे सरकारची मोठी कारवाई

-फडणवीसांच्या काळात सिडकोत घोटाळा झाल्याचा आरोप, कॅगचा ठपका?

-घुसखोर कळवा, बक्षीस मिळवा!; मातोश्री’च्या अंगणात लागले मनसेचे पोस्टर

-‘सर्व मोदी चोर आहेत’ म्हणणाऱ्या राहुल गांधींना न्यायालयाचा दिलासा

-पुराचा फटका बसलेलं ‘हे’ गाव घेतलं भाईजाननं दत्तक