शिधापत्रिका नसली तरी तीन महिन्यांचे धान्य मोफत मिळायला हवं- फडणवीस

पुणे | शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांचे धान्य मोफत देण्याचे स्पष्ट आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्याची त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी. शिधापत्रिका नसली तरी मोफत धान्य दिलं जावं, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज्य सरकारने 18 मार्च रोजी पहिला आदेश काढला. त्यात शिधा पत्रिकाधारकांना तीन महिन्याचे धान्य मोफत देण्याचा उल्लेख होता. नंतर 31 मार्च रोजी काढलेल्या आदेशात त्या-त्या महिन्याचे धान्य द्या, असे सांगितले. अशा दोन भिन्न आदेशांमुळे संभ्रमाचे वातावरण झाले आहे ते दूर व्हायला हवे, असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

शिधापत्रिकाधारकाने शिधापत्रिकेचा वापर केला नसेल तरी ते रद्द करण्यात येऊ नये, त्यावरही धान्य देण्यात यावे. शिवाय ज्यांच्याकडे शिधापत्रिका नसेल त्यांनाही आधारकार्डाच्या आधारे किंवा साक्षांकीत प्रती करुन तात्पुरते कार्ड पुरवावे आणि त्यावर धान्य देण्यात यावे. राज्यात धान्याअभावी कोणीही उपाशी राहू नये, अशी कळकळीची विनंती असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जे धान्य आधी एकाच वेळी तीन महिन्याचे देण्यात येणार होते. त्यात आता बदल करून हे धान्य दरमहा मिळणार आहे. यामध्ये तांदूळ, गहू आणि डाळ देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –

-कोरोनाला संपवण्यासाठी रोहित पवारांनी केलं खास आवाहन, सुचवली नवी आयडिया!

-धारावीत सफाई कर्मचाऱ्यालाच करोनाची लागण; आरोग्य विभागाचं टेंशन वाढलं

-“मरकजमधील व्यक्तींनी पुढे येऊन तपासणीसाठी सहकार्य करावं, महाराष्ट्रात कोणताही धार्मिक कार्यक्रम नको”

-कोरोनाच्या लढ्यात इंदोरीकर महाराजांची ‘लाखमोलाची’ मदत!

-“संजय राऊत म्हणजे शरद पवारांच्या घरचं खरूजलेलं कुत्रं”