नाना पटोलेंना कृषिमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र… – देवेंद्र फडणवीस

मुंबई |  शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तुम्ही कायम आक्रमक राहिले आहात. त्यामुळे खरे तर मला अपेक्षा होती की या सरकारमध्ये तुम्हाला कृषिमंत्री पद मिळेल, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना म्हटलं आहे.

विधानसभेचे अधिवेशन सुरु आहे. नवर्निर्वाचित विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या निवडीबाबत सभागृहात त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे. अभिनंदन प्रस्तावावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी वरील वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विधानसभा अध्यक्षांचे अभिनंदन केले आहे. शेतकरी पुत्र विधानसभा अध्यक्ष झाला याचा आनंद आहे. बंडखोर स्वभावाचा, अन्याय सहन न करणारा, आपलं मत मांडताना कोणाचीही पर्वा न करता धाडस दाखवणारा अध्यक्ष, असं म्हणत ठाकरेंनी त्यांचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले आणि भाजपकडून किसन कथोरे यांची नावं जाहीर करण्यात आली होते. मात्र, नंतर भाजप उमेदवाराने माघार घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-