शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा काय लोकांनी उपाशी राहावं का?- देवेंद्र फडणवीस

मुंबई | राज्यात सर्वसामान्यांना शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा काय लोकांनी उपाशी राहावं का? असा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारमध्ये नियोजनाचा आभाव दिसून येतो. राज्याच्या वतीने अद्याप ठोस भूमिका दिसून येत नसल्याची खंतही फडणवीस यांनी व्यक्त केली. मुलाखतीत ते बोलत होते.

शिवभोजन लाख-दीड लाख लोकांना दिलं जाते. त्यामुळे गरिबांच्या पोटाला अन्न मिळतेय. पण शिवभोजन तर फक्त दिवसातून फक्त एकदाच दिलं जाते. दोनदा दिलं जात नाही. तेही फक्त दोन-तीन तास. लोकांनी एकदाच जेवावं आणि दुसऱ्यांदा उपाशी राहावे, असं तर आपल्याला करता येणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारने सर्वसामान्या लोकांच्या खाण्यापिण्यासाठी योग्य नियोजन करावे. कम्युनिटी किचनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जेवण पोहचवावं. सरकारने प्रक्टीकल विचार करायला हवा. तसेच सरकारचे अंग बचावचे धोरणही चुकीचं आहे. लवकरच सरकारने आपलं धोरण बदलावं, अशी टीका माजी फडणवीस यांनी सरकारवर केली आहे.

दरम्यान, मध्यमवर्गीय महिना-दोन महिने माल खरेदी करू शकतात पण त्यानंतर पुढे सर्वजण रेशनच्या दुकानासमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडून आलेला माल तात्काल रेशनपर्यंत पोहच करून तीन महिन्यापर्यंतचे मोफत धान्य उपलबद्ध करून द्यावे अशी विनंतीही फडणवीस यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-तुझे हातपाय मोडले असते; पोलीस अधिकाऱ्याची जितेंद्र आव्हाडांना धमकी

-कोरोना विरोधातील लढाईसाठी काँग्रेसची टास्कफोर्स; ‘या’ 18 नेत्यांना जबाबदारी दिली

-‘या’ राज्याच्या सरकारनं लॉकडाउन वाढवला; देशातील पहिलं राज्य

-कोरोना: पुण्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर तर रुग्ण संख्या २०४

-कंगना रनौतच्या बहिणीची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका; म्हणाली…