दिल्लीच्या प्रचारासाठी गेलेल्या फडणवीसांची केजरीवालांवर जोरदार टीका; म्हणाले…

नवी दिल्ली |  दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी दिल्ली भाजपला आता महाराष्ट्रातून मदत मिळणार आहे. आजपासून महाराष्ट्रातील भाजपचे नेते दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये आयुष्यमान भारत योजना लागू होऊ दिली नाही. तसंच प्रधानमंत्री आवास योजना देखील लागू होऊ दिली नाही. केजरीवालांना वाटत नाही का की गरिबांना घरं मिळावीत…??? गरीबांना चांगल्या इस्पितळात उपचार मिळावेत..?? असे सवाल त्यांनी केजरीवालांना विचारले.

आम आदमी पक्षाने विकासाचं राजकारण केलं नाही. त्यांनी फक्त केंद्र सरकारच्या योजना दिल्लीमध्ये लागू होणार नाहीत याची काळजी घेतली, अशी टीका फडणवीसांनी केली.

देवेंद्र फडणवीसांनी केंद्र शासनाने कोणकोणत्या लोकहिताच्या योजना राबवल्या याची माहिती दिल्लीकरांना दिली. तसंच भाजपला निवडून देण्याचं आवाहन देखील केलं. आज त्यांनी देवली विधानसभा मतदारसंघात जाऊन प्रचारसभा घेतली.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

वाघा बॉर्डरवर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणांनी आसमंत दुमदुमला; संभाजीराजेंचं ट्वीट

-देशाची संस्कृती टिकली ती शीख आणि मराठ्यांच्या तलवारीवर!- संभाजीराजे

-“वाचाळीवर राऊत…. पवारांची विठ्ठलाशी तुलना महाराष्ट्र सहन करणार नाही”

-ठरवलं तर पाकिस्तानला फक्त 10 दिवसांत धूळ चारू- मोदी

सत्ता असताना गोट्या खेळत होता का?? जलीलांचा पंकजांना सवाल