महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची पंढरपूर वारी अन् पुढची सगळी राजकीय गणितं सेट?? भोजन, चहा, फराळ ‘या’ नेत्यांकडे

पंढरपुर |  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाचे दर्शन घेतले अन् त्याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढची सगळी राजकीय गणित सेट केली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आषाढी दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्र्यांचं सोलापुरात आगमन झालं अन् त्यांच्या स्वागताला काँग्रेस आमदार सिद्धराम मेहत्रे आणि भारत भालके तयार होते. या दोन काँग्रेस आमदारांनी मोठ्या आनंदाने मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. त्यांचं स्वागत स्विकारल्यानंतर मुख्यंमंत्र्यांनी भाजपचे वादग्रस्त आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

प्रशांत परिचारक यांच्या बाजार समितीच्या कार्यक्रमाला हजेरी लावत मुख्यमंत्र्यांनी त्यांचं मन राखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिचारकांकडेच त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. रात्री मग पद्मजा जोगळेकर यांचं शास्त्रीय गायन मुख्यमंत्र्यांनी सपत्निक ऐकणं पसंद केलं.

विठ्ठलाच्या पूजेनंतर काँग्रेसमधून भाजपात आलेले कल्याणराव काळे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी चहापाण केले. काळे यांच्याकडून मुख्यमंत्री थेट काँग्रेस आमदार भारत भालके यांच्याकडे जाऊन पोहचले आणि तिथे त्यांनी फराळाचा आस्वाद घेतला.

भालके भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. विखेंबरोबरच भालकेसुद्धा प्रवेश करतील अशीही चर्चा होती. खुद्द विखे पाटीलच मुख्यमंत्र्यांना घेऊन भालकेंकडे गेले.

दरम्यान, विधानसभेचे वारे काही दिवसांत वाहू लागणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारीत चांगलाच चाणाक्षपणा दाखवला.

IMPIMP