महाराष्ट्र मुंबई

इतर राज्यांप्रमाणे शेतकरी, बारा बलुतेदारांना पॅकेज द्या- देवेंद्र फडणवीस

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा राज्य सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. भाजप नेत्यांनी आज कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत राज्यपालांची भेट घेतली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने इतर राज्यांतील सरकारांनी दिलेल्या पॅकेजप्रमाणे राज्यातील शेतकरी आणि बारा बलुतेदारांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

सध्या उदभवलेल्या परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. राज्य सरकारने शेतमालाच्या खरेदीची व्यवस्था केलेली नाही. शेतमाल खरेदीचे पैसे केंद्राकडून दिले जातात. मात्र हा माल खरेदी करण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, अद्याप अशाप्रकारचे पॅकेज जाहीर करण्यात न आलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आर्थिक पॅकेजबाबत जसं केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहावं, असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून हा परप्रांतीय तरुण छत्रपती शिवरायांचा फोटो हातात घेऊन यूपीला रवाना झाला!

-मन मोठं असावं लागतं… भिकाऱ्याने 100 कुटुंबाला दिलं महिन्याभराचं राशन आणि 3 हजार मास्क

-“राहुल गांधींनी मजुरांच्या व्यथा जाणून घेतल्याने निर्मलाताईंना दुख: झालं हे अक्रितच”

-प्रेक्षकांशिवाय मॅच खेळणं म्हणजे नवरीशिवाय लग्न करणं- शोएब अख्तर

-रोज पत्रकार परिषदा घेताय पण लोकांच्या मुखापर्यंत पॅकेज पोहचेल तो दिवस खरा- संजय राऊत