गरिबांसाठी 50 हजार कोटींचं पॅकेज द्या- देवेंद्र फडणवीस

मुंबई | शेतकरी, असंघटित कामगार, रिक्षाचालक, मजूर, बारा बलुतेदार अशा प्रकारच्या सर्व गरिबांसाठी 50 हजार कोटी रुपयांचं पॅकेज द्यावं. केंद्राने जीडीपीच्या 5 टक्के कर्ज घेण्याची परवानगी राज्याला दिली आहे, केंद्राच्या गॅरंटीवर महाराष्ट्राला एक लाख 60 हजार कोटी रुपये मिळू शकतात, असं गणित विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं.

ठाकरे सरकारविरोधात भाजपने ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’, असं म्हणत महाराष्ट्र बचावचा नारा दिला आहे. यावेळी फडणवीसांनी मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर अंगणात आंदोलन केलं.

राज्य सरकार अंग चोरुन काम करतंय. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडने पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही, केंद्राने 468 कोटी दिले, याशिवाय 1600 कोटी रुपये मजुरांच्या स्थलांतरासाठी दिले, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला.

दरम्यान, असंघटीत कामगार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्याबाबत निर्णय घ्यायला हवा, कोरोनाचे उपचार मोफत व्हायला हवेत, खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन सर्वांवर मोफत उपचार व्हावे, अशाी मागणी फडणवीसांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मार्च ते ऑगस्ट या 6 महिन्यांसाठी कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा

-कोरोनाला हरवण्यासाठी खास नागपुरकरांसाठी तुकाराम मुंढेंनी काढला नवा आदेश

-मुलीचा विवाह सोहळा पार पडताच गँगस्टर अरूण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

-डोमकावळ्यांची फडफड औटघटकेची ठरेल; संजय राऊतांची अग्रलेखातून सडकून टीका

-“ज्यांना सत्तेच्या अंगणातून हाकलून दिलंय ते आंदोलन करतायेत, मेरा आंगण मेरा रणांगण”