मोठी बातमी! बहुमत चाचणीपूर्वी देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर महाराष्ट्रात मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. त्यात राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीचे आदेश दिल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच चिघळलं आहे.

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार अल्प मतात गेलं आहे. त्यामुळे बहुमत चाचणी व्हावी, अशी विनंती करणारं पत्र भाजपने मंगळवारी राज्यपालांना दिलं.

शिंदे गटाकडे सध्या 51 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. बहुमत चाचणीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं असून यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बहुमत चाचणीत मनसेनं भाजपला मत द्यावं, अशी विनंती फडणवीसांनी राज ठाकरेंकडे केल्याचं म्हटलं जात आहे.

उद्या बहुमत चाचणी असल्याने देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना फोन करत त्यांचा पाठिंबा मागितला आहे. तर राज ठाकरेंनी देखील मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

विधानसभेत राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. तर राजू पाटील बहुमत चाचणीत भाजपला मतदान करतील, असं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं आहे.

दरम्यान, शिंदे गटातील बंडखोर आमदार गुवाहाटीवरून गोव्यासाठी रवाना झाले आहेत. बंडखोर आमदार उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे उद्या बहुमत चाचणीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

‘बहुमत चाचणीत आमचाच विजय होणार, मुंबईत येताच…’, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

“हारी बाजी को जितना जिसे आता है वो देवेंद्र कहलाता है”

राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव, उद्या बहुमत चाचणी होणार?

आसाममधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शिंदे गट सरसावला, केली ‘ही’ मोठी घोषणा

संजय राऊत आजपासून बोलणं बंद करणार, स्वतःच सांगितलं कारण…