मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची यांची काल सभा पार पडली. या सभेतून त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधल्याचं पहायला मिळालं.
उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर आज भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी उत्तर सभा घेतली. आज सगळ्यांचं लक्ष फडणवीसांच्या सभेकडे लागलं होतं.
गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची जाहीर उत्तर सभा पार पडली. सभेला सुरुवात करताच त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करायला सुरुवात केली.
देवेंद्र फडणवीसांनी अनेक मुद्द्यांवरुन शिवसेनेला धारेवर धरलेलं पहायला मिळालं. मुख्यमंत्र्याची कालची सभा मास्टर सभा असून लाफ्टर सभा असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझे वजन कमी करू शकणार नाही. तुमच्या सत्तेच्या ढाच्याला पाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असा घणाघात फडणवीसांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेतून नवीन काहीच ऐकायला मिळालं नाही. ते विकासाच्या मुद्द्यावरही बोलत नाही असं फडणवीसांनी म्हटलं.
फडणवीसांच्या सभेनंतर आता शिवसेना काय पलटवार करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“कौरवांची सभा काल झाली आज पांडवांची सभा आहे”; फडणवीसांचा हल्बाबोल
“मुख्यमंत्र्यांची कालची सभा मास्टर सभा नसून लाफ्टर सभा होती”
Weather Update | ‘या’ भागात उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा अंदाज
राज ठाकरेंबाबत भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…
मोठी बातमी! भारतीय बॅडमिंटन संघानं तब्बल 73 वर्षानंतर रचला इतिहास