“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ कार चालवतात, हे सरकार तर भगवान चालवतो”

जालना | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांनी औरंगाबाद शहरात जलआक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोचक शब्दात टीका केली होती.

या आक्रोश मोर्चाचा भाजपचा सत्तेचा आक्रोश असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर भाजपने आज जालना जिल्ह्यात असाच मोर्चा काढला आहे.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एकदा ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ कार चालवतात. हे सरकार तर भगवान चालवतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

हे सरकार ईश्वर भरोसे चालू असल्याची टीका देखील फडणवीसांनी केली आहे. पाणी मुख्यमंत्र्यांनी नाही तर ईश्वराने दिलं असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

शिवसेना व भाजपची युती तुटल्यापासून दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जालन्यातील पाणी प्रश्नावरून देखील देवेंद्र फडणवीसांनी आणखी एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, पिण्याच्या पाण्याच्या असो की सिंचनाच्या, सर्व योजना ठप्प करण्याचं काम या सरकारने केलं असल्याचा घणाघाती आरोप फडणवीसांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘फक्त शिवसेनेचंच हिंदुत्व असली’, दीपाली सय्यद कडाडल्या

रावसाहेब दानवेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले ‘विरोधकांनी माझ्या मागे….’

“प्रिय अण्णा…. किमान वाढदिवसाच्या निमित्ताने तरी त्यावर बोलाल हीच अपेक्षा”

…तर महिन्याला पाच हजार रुपयांपर्यंत मिळेल पेन्शन; सरकारची भन्नाट योजना

पोरींचा भर रस्त्यात राडा; हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल