मुंबई | आम्ही सरकार पाडणार हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांना सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल त्यांना करण्यात आला. यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.
भारताचा राजकीय इतिहास पाहिला तर अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ती अंतर्विरोधाने पडतात. जेव्हा सरकार अंतर्विरोधाने पडतात त्यावेळी आज पडेल की उद्या पडेल हे सांगता येत नाही. जेव्हा सरकार सर्वात मजबूत आहे असं वाटतं तेव्हाच ते पडतं, असं फडणवीस म्हणाले.
जेव्हा आता पडेल असं वाटतं तेव्हा ते टिकतं. त्यामुळे ही अशी सरकारे टिकत नाहीत. ते आपल्या अंतर्विरोधानेच पडेल. पहिल्या दिवशीपासून सांगतोय आम्ही सरकार पाडणार नाही. ज्या दिवशी सरकार पडेल. तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ, असंही त्यांनी म्हटलंय.
विरोधी पक्ष म्हणून आम्ही विरोधी पक्षाच्या मोडमध्ये आहोत. जनतेचे प्रश्न मांडत आहोत. पूर आला तरी आम्ही पोहोचतो. अतिवृष्टी झाली तरी आम्ही पोहोचतो, शेतकऱ्यांच्या बांधावर आम्ही गेलो. चिखलात जाऊन आम्ही त्याचं दुख: बघितलं आहे, असंही फडणवीसांनी सांगितलं.
एक दिवस आम्ही घरी बसलो नाही. विरोधी पक्षाचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. म्हणूनच सत्तारुढ पक्षाला त्याचे चिमटे बसत आहेत. त्यामुळेच ते बोलत आहेत, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
या सरकारला पडण्याचीच खूप धास्ती आहे. त्यांना ही सत्ता म्हणजे 20-20 ची मॅच वाटते. कधी संपेल सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी मागील दोन वर्षात जेवढं लुटता येईल, तेवढं लुटण्याचं काम केलं, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
नारायण राणेंनी हे वक्तव्य कोणत्या संदर्भाने केलंय, हे मी सांगू शकत नाही. किंवा चंद्रकांत पाटील यांनीही सरकार पडण्याविषयीचा अंदाज व्यक्त केला, त्याविषयीदेखील ते अधिक सांगू शकतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार येणार, आम्ही महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार”
‘…तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा’; कोरोनाच्या नव्या Omicron व्हेरिएंटची लक्षणं आली समोर
संसदेत प्रश्न विचारा, आम्ही खुल्या चर्चेला तयार, पण…- नरेंद्र मोदी
अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाल्या…
“महाराष्ट्राची बदनामी याच पुत्र प्रेम, पब, पार्टी, पेग आणि पेंग्वीनमुळे झाली”