“तुम्हाला काय फक्त माशा मारण्यासाठी निवडून दिलंय का?…”

मुंबई | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून राज्यातील राजकारण तापलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं राज्यात मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जोरदार वाद रंगला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका होत असल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला ओबीसी आरक्षणावरून धारेवर धरलं आहे. भाजप ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

काही वाटेल ते झालं आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तरी ओबीसी आरक्षणाचा लढा लढला जाईल, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे.

मुजोरी चांगली नाही पण शिकायची असेल तर या नेत्यांकडून शिकली पाहीजे. आजही त्यांच्यातील एखादा उठतो आणि सांगतो ओबीसी आरक्षणाची जबाबदारी केंद्राची आहे. अरे मग तुम्ही कशाला सरकारमध्ये आहात, असा सवाल फडणवीसांनी केला आहे.

सत्ता द्या ना मग केेंद्राच्या हातात, चालवेल ना केंद्र सरकार आणि तुम्हाला काय फक्त माशा मारायला निवडून दिलं आहे का?, असा सवाल फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.

तुम्हाला माल कमावण्यासाठी, वसुली करण्यासाठी निवडून दिलं आहे का?, असं म्हणत फडणवीस यांनी सरकारवर होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपांवर बोट ठेवलं आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश सरकारला दिल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात वाद वाढला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

धक्कादायक! KGF 2 फेम अभिनेत्याचं निधन; बंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास 

सर्वसामान्यांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला 

IAS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले

मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याला अटक होण्याची शक्यता