महाराष्ट्र मुंबई

माझ्या वाढदिवसावर वायफळ खर्च करु नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मुंबई : लोकप्रतिनीधी तसेच कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसाचा बडेजाव, गाजावाजा करत साजरा करु नका, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस 22 जुलैला आहे. यादिवशी ठिकठिकाणी बॅनर लावू इच्छिणाऱ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलं आहे. 

वाढदिवसाच्या दिवशी कोठेही बॅनर, होर्डिंग, जाहिरात दिसणार नाही याची प्रत्येक आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यावी, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट बजावलं आहे.

जल्लोषाचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करु नयेत, असंही मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना बजावलं आहे. 

माझ्या वाढदिवसानिमित्त कोणाला खर्च करण्याची इच्छा असेल त्यांनी तो निधी ‘मु्ख्यमंत्री सहायता निधी’ म्हणून द्यावा, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकच काढलं आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्र्याच्या या निर्णयामुळे त्यांचा साधेपणा आणि सामाजिक जाणीव सहजपणे दिसून येते.

महत्वाच्या बातम्या- 

-चंद्रकांत पाटील म्हणतात शिवसेनेने काढलेला मोर्चा योग्यच!

-मी येतोय… सगळ्यांचे आभार मानायला आणि मनं जिंकायला- आदित्य ठाकरे

-शिवसेनेला मोर्चाच काढायचा होता तर ‘वर्षा’ बंगल्यावर का नाही काढला??- निलेश राणे

-धोनीच्या सेमीफानलच्या खेळीवरून युवराजच्या वडिलांचा अतिशय गंभीर आरोप!

-शिवसेनेत जाण्याच्या चर्चांवर संग्राम जगताप यांचा मोठा खुलासा

IMPIMP