महाराष्ट्र मुंबई

खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण- देवेंद्र फडणवीस

मुंबई | खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देशातले सगळ्यात जास्त रुग्ण ज्या राज्यात आहेत त्या सरकारमधले मंत्री स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

महाराष्ट्राच्या जनतेला मित्र कोण आणि शत्रू कोण हे चांगलंच माहित आहे. सरकारला आम्ही मदतच करतो आहोत. मात्र सरकारच्या वतीने फेकाफेक केली जात असेल तर त्याचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी तासन् तास बैठका घेऊन संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी लागली. एवढ्या बैठका कोरोनाविरोधातली लढाई लढण्यासाठी घेतल्या असत्या तर महाराष्ट्राची आज ही अवस्था झाली नसती, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

खरं बोलायचं असेल तर एकच माणूस पुरेसा असतो. मात्र फेकमफाक करायची असेल तर तीन माणसं लागतात अशाच प्रकारे तीन मंत्र्यांनी एकत्रित येऊन पूर्णपणे विसंगत माहिती देऊन माझ्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजप महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू?- जयंत पाटील

-‘फडणवीसांची आकडेवारी आभासी’; फडणवीसांच्या दाव्याची ठाकरे सरकारकडून पोलखोल

-नारायण राणेंच्या मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा; राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी

-सायन रुग्णालयातील एक महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात; डॉक्टरांकडून टाळ्या वाजवून कौतुक

-सांगली जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफी योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र