ठाकरे सरकारचा फडणवीसांना दणका! आता ‘या’ प्रकरणाची चौकशी होणार

मुंबई | माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील जलयुक्त शिवार योजनेमध्ये काही घोटाळे झाल्याचा आरोप करण्यात आला होता. जलयुक्त शिवार योजनेत जर गैरकारभार झाला असेल तर कारवाई करावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

आता देवेंद्र फडणवीस सरकारच्या 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या कार्यकाळातील ऊर्जा विभागातील पायाभूत सुविधांच्या विकास कामातील 6500 कोटी रूपयांच्या कामांची चौकशी करण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. ऊर्जा विभागातील चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून एक डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील वीज वितरणाच्या दुरूस्तीची आणि विकासाची अनेक कामे करण्यात आली आहेत. गेल्या 14 वर्षात पायाभूत सुविधांनी कामे करण्यात आली आहेत.

2007 ते 2014 या काळामध्ये 12 हजार कोटी रूपयांची पायाभूत सुविधांची कामे करण्यात आली आहेत. ही कामे प्रोजेक्ट क्रमांक एक अंतर्गत करण्यात आली आहेत. तसेच प्रोजेक्ट क्रमांक दोन मध्ये 2014 ते 2019 या काळात 6500 कोटी रूपयांची कामे करण्यात आली होती.

नविन वीज उपकेंद्र उभारणी, 11 केव्ही उच्चदाब वाहिन्या टाकणे, ट्रान्सफॉर्मर उभारणी, इत्यादी कामे करण्यात आली आहेत. आता महावितरणाचे संचालक रवींद्र सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

चौकशी समिती सहा सदस्यीय असणार आहे. यामध्ये महावितरणाचे संचालक संचलन, संचालक प्रकल्प, मुख्य अभियंता पायाभूत सुविधा आणि परिमंडळाचे मुख्य अभियंता असतील तर समितीचे सदस्य सचिव महावितरणाचे कार्यकारी संचालक असणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू असतानाचं आता 6500 कोटी रूपयांच्या ऊर्जा विभागातील पायाभूत सुविधांच्या कामाची चौकशी होणार आहे. यामुळे भाजप आणि शिवसेना संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर महावितरणाच्या क्षेत्रीय कार्यलयांकडून 3387 हजार कोटी रूपयांच्या कामाचे प्रस्ताव ऊर्जा विभागात सादर झाले होते.

तेव्हा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना गेल्या काही वर्षांमध्ये तीच कामे झाली असताना पुन्हा त्याच प्रकारची कामे का येत आहेत? याची माहिती घेण्यास सांगितले होते.

ऊर्जा विभागातील अनेक कामांमध्ये अनियमितता असल्याचं समोर आलं आहे. स्थानिक कंत्राटदार आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी मिळून 2 कोटी रूपायांची बनावट बिले तयार करून पैसे उकळण्याचे प्रयत्न केल्याचं निदर्शनास आलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेवून नितीन राऊत यांनी संबंधितांवर कारवाई करण्याच्या सुचना केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-  

…अन् त्यांच्या सन्मानासाठी खुद्द राष्ट्रपती मंचावरून उतरले

  “हायड्रोजन सोडा, मलिकांना आता ऑक्सिजनची गरज पडेल”

‘बिग बाॅस 15’: अभिनेता राकेश बापट रुग्णालयात दाखल

मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी