भास्कर जाधवांनी मोदींची नक्कल केल्याने विधानसभेत राडा; देवेंद्र फडणवीस संतापले

मुंबई |  राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं.

आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल केल्यानं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षाचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले. तसेच भाजपच्या सदस्यांनी विधानसभा डोक्यावर घेतली.

देशाच्या पंतप्रधान यांनी म्हटलं होतं की 15 लाख रुपये  रुपये खात्यावर देणार म्हटलं होतं. त्यांनी दिलं का? असं नितीन राऊत म्हणाले. यावर पंतप्रधान यांनी असं वाक्य कुठ म्हटलं आहे हे दाखवा नाही तर माफी मागावी, असं फडणवीस म्हणाले.

या सभागृहाच्या बाहेरील व्यक्ती संदर्भात असं बोलता येणार नाही.  त्यांनी माफी मागितली पाहिजे किवा शब्द मागे घेतला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. अशात यावर बोलताना भास्कर जाधव यांनी मोदींची नक्कल केली. यावर विरोधक भडकले.

भास्कर जाधवांना निलंबित करा, अशी मागणी विरोधकांनी केली. यावर भास्कर जाधव म्हणाले की, मी ते पंतप्रधान असल्याच्या आधी बोललो आहे. पंतप्रधान झाल्यावर असं मी बोललो नाही.

अंगविक्षेप मागे घेता येतो का? हे आम्ही सहन नाही करणार. माफी मागीतली पाहिजे. पंतप्रधान यांचा असा अवमान होणार असेल तर हक्कभंग आणला जाईल, त्यांनी माफी मागावी, असं फडणवीसांनी म्हटलंय.

पंतप्रधानांविषयी अशाप्रकारे अंगविक्षेप करुन बोलताना लाज वाटली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांना सुनावलं.

भास्कर जाधवांनी अंगविक्षेप केल्याचं मान्य केलं आहे त्यांनी माफी मागितली पाहीजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर मी माफी मागू शकत नाही, मी शब्द मागे घेतले आहेत, असं भास्कर जाधव म्हणाले. गोंधळ वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी कामकाज स्थगित केलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

पेपरफुटीच्या चौकशीसाठी वेळ मागणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना नाना पटोलेंचं उत्तर, म्हणाले… 

“उद्धव ठाकरेंनी या वयात हट्ट करू नये, कोणाला तरी चार्ज द्यावा” 

पेपर फुटीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; राजकीय कनेक्शनमुळं खळबळ 

“उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्यावा” 

मद्यावरील टॅक्स कमी का केला?, अजित पवारांनी सांगितलं खरं कारण