मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होणार आहे. या चर्चेत नव्या मंत्रिमंडळा संदर्भात चर्चा होणार आहे. दुपारपर्यंत नव्या मंत्रिमंडळाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचं बोललं जात आहे. यानंतर 12 वाजता शिंदे गटाची बैठक होणार आहे, अशी माहिती आहे. मात्र त्याआधी संभाव्य मंत्रीमंडळाची यादी समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, मंगलप्रभात लोढा, संजय कुटे, रवींद्र चव्हाण, डॉ. अशोक उईके, सुरेश खाडे, जयकुमार रावल, अतुल सावे, देवयानी फरांदे, रणधीर सावरकर, माधुरी मिसाळ या नेत्यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई, बच्चू कडू, तानाजी सावंत, राज्यमंत्री दीपक केसरकर, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, भरत गोगावले, या नेत्यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे.
प्रसाद लाड, जयकुमार गोरे, प्रशांत ठाकूर, मदन येरावार, महेश लांडगे किंवा राहुल कुल, निलय नाईक, गोपीचंद पडळकर, बंटी बांगडिया या नेत्यांना राज्यमंत्री पद मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि 10 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे. शिंदे गटाने 39 आमदारांसह बंड पुकारल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारने बहुमत सिद्ध करावं असं सांगितलं. त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या बाजूने न लागल्याने उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची नामुष्की आली. त्यासोबतच त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
“स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धव ठाकरेंच्या मागे ठामपणे उभे राहिले”
औरंगाबादच्या नामांतरावरुन जलील आक्रमक, म्हणाले ‘या दलाल नेत्यांवर थुंका’
आता महाराष्ट्रात येणारं भाजप सरकार पुढील 25 वर्षे चालेल- देवेंद्र फडणवीस
शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता जाणार शिंदे गटात
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, महाविकास आघाडी सरकार कोसळलं