राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड; देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस आज अचानक राज ठाकरे यांच्या घरी आले.

ही कौटुंबीक भेट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, कौटुंबीक भेट असली तरी या भेटीत राजकीय गप्पा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे या भेटीचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात हे दोन्ही नेते हास्यविनोद करताना दिसत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्याच कालावधीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज हे नव्या घरात राहायला आल्यानंतर फडणवीस हे पहिल्यांदाच त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. शिवाय पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत.

भाजप आणि मनसे दरम्यानच्या युतीच्या चर्चा मधल्या काळात जोर धरत होत्या. त्या पार्श्वभूमीवरही ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

महाविकासआघाडी आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिस टोकाला जात असताना भाजप आणि मनसे जवळ येतात का या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

मुंबई मनपा निवडणूकीत भाजपा मनसे युती होणार का याची राजकीय चर्चा वर्तुळात असताना भेट महत्वाची मानली जात आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी राहायला आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत त्यांच्या घरी सपत्नीक आले होते. यावेळी राऊत यांनी राज यांना कन्येच्या लग्नाचं निमंत्रणही दिलं.

राऊत हे राज यांच्या घरी सुमारे अर्धा तास होते. या दोन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पाही झाल्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही राज यांच्या घरी येऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर आज फडणवीसांनी राज यांच्या घरी भेट दिल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

एकाच दिवशी राष्ट्रवादीला सलग दुसरा झटका; ‘या’ बड्या नेत्यानेही दिला राजीनामा 

पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘या’ भागांमध्ये कोसळणार धोधो पाऊस; वाचा हवामान खात्याचा इशारा 

“ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याला पनवती लागली” 

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा