उदयनराजे की संभाजीराजे?, मराठा आरक्षणाचं नेतृत्त्व कुणी करावं?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

मुंबई | मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असताना राज्य सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आहे. यावरुन राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे. राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्त्व कुणी करावं, यावरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. उदयनराजेंनी मराठा आरक्षणाचं नेतृत्त्व करावं, अशी मागणी काही जणांकडून केली जातेय, तर काही जणांकडून खासदार छत्रपती संभाजीराजेंचं नाव पुढं केलं जात आहे. या दोघांपैकी नेमकं कुणी मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्त्व करावं, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता.

छत्रपतींच्या घराण्यात कुणीही फूट पाडण्याचा प्रयत्न करु नये. मराठा आरक्षणासाठी दोन्हीही नेते आग्रही आहेत आणि प्रयत्नशीलही आहे. या दोघांनीही या आंदोलनाचं  नेतृत्व करावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात स्थगित करण्यात आलं. मात्र या मुद्द्यावर मला राजकारण करायचं नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही माझी आग्रही भूमिका आहे. आमचं सरकार असताना आम्ही ते दिलंही होतं, मात्र आता स्थगिती मिळाली असली तरी आपण सर्वांनी पाठपुरावा करुन ते मिळवून दिलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मी ब्राह्मण असल्यानं मला टीकेचा धनी केलं जात आहे, मी मराठा आरक्षणविरोधी असल्याचं भासवलं जात आहे, असं फडणवीस म्हणाले. तसेच राज्य सरकारनं नुकतीच पोलीस भरतीची घोषणा केली आहे. यावरही फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना पोलीस भरतीची घोषणा करायला नको होती. या भरतीची घोषणा करतेवेळी राज्य सरकारनं विचार केला नाही का? लगेच ती करण्याची घाई नव्हती. सर्वोच्च न्यायालयात काय होतंय हे पाहून एक महिना नंतर भरती झाली तर मोठं नुकसान होणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

आता राज्य सरकारनं यावर मार्ग काढायला हवा. मराठा समाजाला आश्वस्त करायला हवं, नाहीतर मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटतं असं संभाजीराजे म्हणाले ते खरं आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

रिया चक्रवर्ती ‘या’ देशांतून सुशांतसाठी ड्र.ग्ज मागवत होती

रियानं मला ‘या’ कारणामुळं जबरदस्ती सुशांतची मॅनेजर बनवलं होतं; श्रुती मोदीचा धक्कादायक खुलासा

पूजा भट्टनं सांगितलं ड्र.ग्ज घेण्यामागचं कारण, सोशल मीडियावर झाली प्रचंड ट्रोल

सुशांत आणि साराच्या नात्यावर कंगनानं केला धक्कादायक खुलासा! करीना कपूरचं नाव घेत म्हणाली…