नगरमध्ये भाजपचा खासदार असताना सुजय विखेंना तिकीट का दिलं?; फडणवीस म्हणतात…

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘द इनसायडर’ला दिलेल्या मुलाखतीत आतापर्यंतच्या अनेक न अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यामध्ये नगरमध्ये भाजपचा खासदार असताना सुजय विखेंना पक्षात घेऊन का उमेदवारी दिली?, यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

नगर दक्षिणमध्ये दिलीप गांधी भाजपचे खासदार होते, मात्र आमच्या सर्व्हेत अँटी इन्क्बन्सी असल्याचं आम्हाला दिसलं. गेल्या निवडणुकीसारखं ४२ जागा जिंकून आणण्याचा आमचा प्रयत्न होता, त्यामुळे नगरमध्ये उमेदवार बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला, असं फडणवीस म्हणाले.

आम्ही गांधी सोडून दुसऱ्या नावाचा विचार करत होतो, अशावेळी राधाकृष्ण विखे पाटील भाजपात यायला तयार झाले. त्यांच्या मुलाने या मतदारसंघात ४ वर्षे मेहनत घेतली होती. त्यामुळे त्यांना तिकीट देण्यात आलं, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

दरम्यान, दिलीप गांधी हे चांगले व्यक्ती आहेत. तिकीट नाकारलं म्हणजे त्यांचं राजकारण संपलं असं नाही. गांधी उद्या दुसऱ्या कुठल्या पदावरही दिसू शकतील. कदाचित ते खासदार, आमदार, विधान परिषद किंवा राज्यसभेवर देखील असतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून चंद्रकांत पाटील कोथरुडमधून विधानसभा निवडणूक लढले- देवेंद्र फडणवीस

-भाजप-राष्ट्रवादीचे सरकार २ वर्षांपूर्वी बनले असते, पण… फडणवीसांचा धक्कादायक खुलासा

-गूड न्यूज… पूर्व लडाखमधून चीन सैन्य मागे घेण्यास तयार!

-एवढ्या जागा जिंकूनही मी मुख्यमंत्री झालो नाही याचं वाईट वाटलं- फडणवीस

-हजारो भारतीयांना आता नोकरीसाठी अमेरिकेची दारं बंद कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला हा निर्णय!