‘देवेंद्र फडणवीस जाहीर माफी मागा, अन्यथा…’; नवाब मलिकांचा फडणवीसांना इशारा

मुंबई | मुंबईमध्ये क्रुझवर एनसीबीनं मोठा छापा टाकला होता. यामध्ये अनेक जणांना ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलं. मुंबई ड्रग्ज प्रकरणी अटक केलेल्या लोकांमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही होता त्यामुळे हे प्रकरण आणखीनच प्रकाशझोतात आलं. यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडालेली पहायला मिळाली.

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणवारुन राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. याशिवाय त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाले.

याप्रकरणावरुन नवाब मलिकांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. मलिकांनी साधलेल्या या निशाण्यावर फडणवीसांनीही पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीसांची पत्रकार परिषद संपतेच तोच मलिकांनही पत्रकार परिषद फडणवीसांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं. त्यामुळे आता मलिक-फडणवीस वाद चांगलाच पेटलेला पहायला मिळत आहे.

आजही नवाब मलिकांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळीही त्यांनी फडणवीसांना लक्ष करत जाहीर माफी मागण्यास सांगितलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवाब मलिकांनी सगळ्याचं लक्ष आपल्याकडे वळवलं आहे.

नवाब मलिकांच्या मुलीनं, निलोफर खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट 5 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. फडणवीसांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात मानहानीचा आणि फौजदारीचा दावा ठोकला जाईल, असं यामध्ये स्पष्ट करण्यात आलं. यावरुनच मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

याविषयी बोलताना भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितली नाही. किंवा विधाने मागे घेतली नाही तर त्यांच्याविरोधात फौजदारी आणि दिवाणी दावा दाखल करण्यात येईल, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिकांची मुलगी निलोफरनं देवेंद्र फडणवीस यांना चुकीचे आरोप केल्यामुळे अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. याविषयी ट्विट करत माझ्या कुटुंबावर देवेंद्र फडणवीस यांनी लावलेल्या चुकीच्या आरोपांसाठी ही अब्रुनुकसानीची नोटीस मी पाठवली आहे. आम्ही आता मागे हटणार नाही, असं निलोफरनं म्हटलं आहे.

दरम्यान, आता मलिकांनी दिलेल्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘…तरच मी तुमचं नेतृत्व करेन’; एसटी कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंनी घातली ‘ही’ अट

फडणवीस म्हणाले ‘डुकराच्या नादी लागायचं नाही’, आता नवाब मलिकांचं जोरदार प्रत्युत्तर 

  ‘काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही…’; प्रियांका गांधींची मोठी घोषणा

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात” 

“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली”