पृथ्वीराज चव्हाणांच्या जिल्ह्यात जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला थेट बाबांनाच सवाल!

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महाजनादेश यात्रा साताऱ्यात होती. आज ही यात्रा सांगलीकडे रवाना होत आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्याच जिल्ह्यात जाऊन थेट सवाल विचारला.

पृथ्वीराज चव्हाण यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही 370 कलमाच्या विरोधातले की बाजूचे? तुम्ही भारताच्या बाजूचे की नाहीत?, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की महाराष्ट्र उद्योगात आठव्या क्रमांकावरुन तेराव्या क्रमांकावर गेला. ही आकडेवारी कुठून आणली माहिती नाही. आकडेवारी दिली नाही असं ते म्हणतात, पण सगळी आकडेवारी केंद्र सरकारच्या वेबसाईटवर असल्याची माहिती दिली आहे. 

त्यांच्या काळात महाराष्ट्र आठव्या क्रमांकवर गेला ही त्यांनी कबुली दिली. ते आरोप करतात उदयनराजे भोसले यांनी तीन महिन्यात राजीनामा दिला म्हणजे लोकशाहीचा खून आहे. त्यांच्या काळात किती वेळा खून झाला याचा विचार करा, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला.

उदयनराजे मुक्त विदयापीठ आहे, हवे तिथे शिस्त पाळतात. कधी ते शिस्तीत तर कधी ते त्यांच्या स्टाईलने राहतील. सामना हे वर्तमानपत्र आहे. सत्य काय आहे ते जनतेला समजतं, असं सामानाातील अग्रलेखाबाबत विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-