उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले…

मुंबई | राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर त्यांनी आरेत कारशेड करण्याचा आमचा निर्णय फिरवला. ठाकरे सरकारने आरेच्या प्रकल्पावर फेरविचार करण्यासाठी सौनिक समिती नेमली. ठाकरे यांनी नेमलेल्या या समितीनेही कांजूरला कारशेड स्थापन करणं योग्य होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

कारशेड कांजूरमार्गला नेलं तर चारवर्षे कारशेड बनणार नाही, असा अहवालाच या समितीने दिला. तरीही केवळ इगोसाठी ठाकरे सरकारने कांजूरला कारशेड करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे.

ठाकरे सरकारचा हा निर्णय इगो करता घेतलेला होता. मुंबईकरांच्या हिताचा नव्हता असं माझं स्पष्ट मत आहे, असं फडणवीस म्हणाले.

जी झाडे कापली आहेत. ती झाडे त्यांच्या आयुष्यात जेवढं कार्बन तयार करतील तेवढं मेट्रो 80 दिवसात करेल. असं कोर्टाने म्हटलं आहे. ही मेट्रो एक एक दिवस लेट करणं म्हणजे मुंबईकरांचं प्रदूषणाच्या माध्यमातून आयुष्य कमी करणं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

दरम्यान, सगळ्या अभ्यास आदित्य ठाकरे यांनीच केलाय असं नाही. ते पर्यावरण मंत्री होते. पण त्यांनी अभ्यास केला असा होत नाही. या कारशेडचा सर्व अभ्यास झाला आहे. मिठी नदीची एवढी होती तर तुमच्या काळात नदी काठी अनधिकृत बांधकामे कशी झाली. बांधकामांना परवानग्याही दिल्या, असा टोला फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

यंदाचे सर्व सण धुमधडाक्यात साजरे होणार, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा 

‘शिवसेना फोडण्यामागे शरद पवार नाही, तर…’; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य 

“शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच” 

“एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवली तर बापाचं नाव लावणार नाही”

आदित्य ठाकरेंचा भर पावसात कार्यकर्त्यांशी संवाद, शरद पवारांच्या ‘त्या’ सभेची करून दिली आठवण