कोल्हापूर | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
काल छत्रपती छत्रपती शाहू राजांचा स्मृतीदिन असल्याने विविध क्षेत्रातली मंडळी आणि शाहूप्रेमी राजांना अभिवादन करत होते. विविध राजकारण्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहू राजांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट केल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मात्र शाहूराजांना अभिवादन करताना चूक झाली. त्यांनी शाहूराजांना सामाजिक कार्यकर्ते असं विशेषण वापरलं. लोकांनी फडणवीसांना याप्रकरणी चांगलंच धारेवर धरलं. त्यानंतर त्यांनी संबंधित पोस्ट डिलीट केलं.
माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणून फडणवीसांनी झाल्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
दरम्यान, संभाजीराजे यांनी एक पोस्ट लिहून मी कोणत्या वेळी काय भूमिका घ्यावी, हे मला कुणी शिकवू नये. मी नेहमीच आमच्या घराण्याला शोभेल अशीच भूमिका घेतो, असं म्हणत त्यांच्या टीकाकारांना त्यांनी उत्तर दिलं होतं.
माजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 7, 2020
महत्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; फडणवीस राज ठाकरेंसह प्रमुख नेत्यांना केलं निमंत्रित
-फडणवीसांच्या शाहू महाराजांवरील त्या वादग्रस्त ट्विटवर; छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया
-…तर तुम्ही दारूच्या बाटल्या घरपोच पुरवण्याची सेवा सुरू करावी; राऊतांचा ‘राज’समर्थकांवर निशाणा
-मी आज जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच- नारायण राणे
-नोकरभरती रद्द करू नका, वर्षभर किमान वेतनावर सेवेत घ्या- रोहित पवार