मुंबई | गोवा विधानसभा (Goa Election) निवडणुकीचं बिगूल वाजल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे.
महाराष्ट्रातून नोटांनी भरलेल्या बॅगा गोव्यात जात आहेत. आमची लढाई याच नोटांसोबत आहे. फडणवीस गोव्यात गेले अन् तिथे भाजपत फूट पडली, असा टोला राऊत यांनी लगावला, ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आता याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊतांच्या या टिकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी शिवसेनेला NOTA ला जेवढी मतं पडतात, तेवढीच मतं मिळणार असल्याचं म्हटलं आहे.
संजय राऊत हे कोणाचे प्रवक्ते आहेत हे आम्हाला माहिती आहे. तसेच संजय राऊत यांनीही पंतप्रधानांबद्दल बोलताना आपली उंची पाहावी, आपण बोलतो किती याचा विचार करावा, असा प्रति टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
गोव्यात आमची खरी लढाई नोटांशीच आहे. भाजपचे लोक गोव्यात नोटांचा पाऊस पाडत आहेत. महाराष्ट्रातून बॅगा जात आहेत. त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल आणि जनतेला दबावाखाली येऊ नका, असे सांगण्याचा प्रयत्न करेल, असं राऊत म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून तिकडे गेले आहेत. फडणवीस गोव्यात गेल्यानंतर भाजप पक्ष फुटला. काल एका मंत्र्याने पक्षाचा त्याग केला. भाजपचे आमदार प्रविण झाटे यांनींही पक्ष सोडला. त्यांनी पक्षातील युद्ध जे सुरु आहे, त्याची लढाई करावी, असंही ते म्हणालेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या कोणत्या भागात किती उमेदवार उतरवायचे याचा निर्णय घेतला जाईल. आज मी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. साधारणत साडे बारा वाजता मी शेतकरी नेते राकेस टिकैत यांची भेट घेणार आहे. याआधी शिवसेनेचे काही कार्यकर्ते तिकडे पोहोचले आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे.
राकेश टिकैत प्रत्यक्ष राजकारणात कधीही सहभागी होत नाहीत. त्यांच्या संयुक्त किसान मोर्चाचा राजकारणाशी संबंध नाही. ते राजकीय नेत्यांशी भेटतही नाहीत. तरीही त्यांची आणि माझी चर्चा होत आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
मनसेला मोठा झटका; आता ‘हा’ नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश
-राज्यातून 191 ट्रेनद्वारे अडीच लाख परप्रांतीय कामगारांना स्वगृही पाठवलं- अनिल देशमुख
-शरद पवारांवरील निलेश राणेंच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…