“नारायण राणेंना नोटीस देऊन बोलावणे हा तर कायदेशीर अपराध”

मुंबई | सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना साक्षीसाठी पोलीसांनी नोटीस पाठवली यावरून राजकीय वातावरणात गरमा-गरमी पाहायला मिळत आहे.

नारायण राणे यांना नोटीस पाठवणाऱ्या सिंधुदुर्ग पोलीसांविरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सिंधुदुर्ग पोलीसांच्या कारवाईवरून हल्लाबोल केला आहे.

सिंधुदुर्ग पोलीसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग पोलीसांवर जोरदार निशाणा साधला आहे.

CRPC 160 ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरले की 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तिला पोलीस स्टेशनमध्ये बोलविताच येत नाही, त्यांची साक्ष घरी जाऊन घ्यावी लागते, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलवणे हा कायदेशीर अपराध आहे, असा घणाघात फडणवीसांनी केला आहे. नोटीस पाठवणाऱ्या पोलीसांविरोधात फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

नारायण राणे यांना नोटीस पाठवणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांवर IPC 166A अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी आमची मागणी असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

जर कारवाई नाही केली तर भाजप CRPC 156(3) अंतर्गत खटला दाखल करेल, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

नोटीस पाठवण्याची कारवाई हे जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा IPC 34 अन्वये सहआरोपी बनवण्याची मागणी भाजप करणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं आहे.

नारायण राणे यांना साक्षीसाठी नोटीस पाठवल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सिंधुदुर्ग पोलीसांनी केलेल्या कारवाईनंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

भारतीय जवानांना मोठं यश; जम्मू-कश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा

“आम्ही मोदींचं अनुकरण करतो, ते मास्क लावत नाहीत म्हणून आम्हीही लावत नाही”

लसवंत होणारी सर्वात पहिली अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण

“देवेंद्रजी तुम्ही उद्या मुख्यमंत्री व्हाल आणि भविष्यात पंतप्रधानही व्हाल पण…”

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!